
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या टप्प्यावर राजकीय घडामोडींना वेग आला असून, निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपने अचानक माघार घेतल्याने निवड बिनविरोध झाली आहे. या निवडीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल पाटील यांचे जिल्हा बँकेवर वर्चस्व कायम राहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जयश्री पाटील यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनिल पाटील यांनी पत्नीच्या माध्यमातून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. माघारीच्या शेवटच्या टप्प्यात आणखी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
