
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. ऊसाला पहिली उचल पाच हजार रूपये द्या आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये अनुदान द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
या अगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसाच्या उचलीसंदर्भात कारखानदारांना इशारा दिला होता. पण कारखानदारांनी त्यांची दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावरील बेमुदत रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे.
